मासिक पाळीत जेवण बनवाल तर पुढच्या जन्मी कुत्री व्हाल! गुजरातमधील स्वामींचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुजमधील मासिक पाळी तपासण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे कपडे उतरवण्यात आले होते. हा वाद शमला नसतानाच दुसरा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मासिक पाळीच्या वेळी जर कुठल्याही महिलेने स्वयंपाक केला तर ती पुढच्या जन्मी कुत्री होईल’ असे वक्तव्य स्वामी कृष्णस्वरूपा दासजी यांनी केले आहे. मासिक पाळी सुरू असलेल्या महिलेने केलेले जेवण कुठल्या पुरुषाने खाल्ले तर तो पुढल्या जन्मी बैल होतो असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. ही गोष्ट शास्त्रात लिहिली असल्याचं स्वामींनी म्हटले आहे.

अहमदाबाद मिररने याबाबत वृत्त दिले आहे. भुजमधील मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींचे कपडे उतरवण्याचा प्रकार ज्या महाविद्यालयात घडला होता ते महाविद्यालय स्वामी कृषणस्वरुपा दासजी यांच्या अनुयायांचे आहे. स्वामींच्या ज्या वक्तव्यावरून बातमी तयार करण्यात आली आहे ते वक्तव्य त्यांनी केलेल्या प्रवचनातील आहे. या प्रवचनाचा वर्षभरापूर्वीचा एक व्हिडीओ आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘मासिक पाळी सुरू असलेल्या महिलेच्या हातचे तुम्ही खाल्ले तर तुम्ही पुढच्या जन्मी बैल व्हाल. जर महिलेने मासिक पाळीच्या वेळी स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्र्याचा मिळतो आणि हे सर्व शास्त्रात लिहिले आहे’

‘हे तुम्हाला पटेल की नाही माहीत नाही मात्र 10 वर्षात मी ही बाब पहिल्यांदा सांगतोय. आपले संत तसेच ऋषीमुनींनी सांगितले की हे धार्मिक गुपित असून ते कोणालाही कळता कामा नये. मात्र जर ही बाब कोणाला सांगितली नाही तर कळणार कशी असं म्हणत स्वामींनी हे वक्तव्य केलं आहे.  म्हणून मुलांनी लग्नापूर्वीच स्वयंपाक बनवणे शिकले पाहिजे असेही स्वामींनी आपल्या प्रवचनात म्हटले आहे.