Live – विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात, विरोधकांचा गोंधळ कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhanbhavan
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला
  • सभागृहात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी
  • राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे देखील विधिमंडळ परिसरात दाखल
  • मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरात पोहोचले
  • कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती सांगितली होती, मात्र सर्व शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांसाठी अनेक अटी ठेवण्यात आल्याने खरी कर्जमाफी अद्याप मिळालेले नाही. त्याविरोधात आम्ही विधिमंडळात आवाज उठवू. तसेच महिलांवरील अत्याचार वाढले असून त्याविरोधात आम्ही सरकारला जाब विचारू, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असेही ते म्हणाले.
  • शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, अशी घोषणाबाजी विरोधकांकडून सुरू
  • विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी सुरू केली
  • राज्याच्या जनतेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लक्ष
  • कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर होणार
  • आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन