उत्तर प्रदेश – ट्रेनची वाट पाहणाऱ्या तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

ट्रेनची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या अमानुष अत्याचारानंतर रात्रभर ती तरुणी बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली. उत्तर प्रदेशातील महराजगंज इथल्या सिसवा बाजार रेल्वे स्टेशनवर पीडिता ट्रेनची वाट पाहत उभी होती. तिला पिपराईच इथे आपल्या मामाकडे जायचं होतं. त्यावेळी तिथे अवैधरित्या वेंडरिंगचं काम करणारे तीन तरुणी तिथे आले आणि तिला गुंगीचं औषध दिलं. या नंतर बेशुद्ध पडलेल्या तरुणीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला तसंच सोडून ते फरार झाले. ती रात्रभर तशीच बेशुद्धावस्थेत पडून होती. जेव्हा सकाळी लोकांनी तिला पाहिलं तेव्हा तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली आणि ते तिला तिथून घेऊन गेले.

त्यानंतर तब्बल चार दिवस बेशुद्ध असलेल्या या तरुणीने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी राम सनेही, भुअर खरवार आणि लाला श्रीवास्तव या तिघांना अटक केली आहे.