
औसा तालुक्यातील विवाहित महिला पाच लेकरासह बेपत्ता असुन तिला महादेव सातपुते याने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार विवाहतेचा पती रखमाजी गायकवाड यांनी पोलीस अध्यक्षीक लातूर यांच्याकडे केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, यल्लोरी येथील मजुर रखमाजी गायकवाड याचा विवाह सवितासोबत 2004 मध्ये झाला होता. हे दोघे मोल मजुरी करुन आपली उपजीविका भागवत होते. दरम्यान त्यांना पाच पत्य झाली. रखमाजी व सविता आपल्या पाच मुलासह सास्तुर ता.लोहारा येथे रखमाजीच्या बहिणीकडे वास्तव्यास होते. सविताने रखमाजीला मी देवदर्शनासाठी तुळजापूरला जात असल्याचे सांगून दि.14 फेब्रुवारी रोजी पाच लेकरासह सास्तुर येथून निघून गेली. ती परतलीच नाही. त्यामुळे रखमाजीने आपल्या पत्नीस फोनवर संर्पक साधला असता तिचा फोन महादेव उत्तम सातपुते याने उचलून तुझी बायको सविता माझ्याकडे आहे. तिला पाठवत नाही, तुला काय करायचे ते कर असे सांगितले. त्यानंतर त्याने तु लातूरात दिसल्यास तुला ठार मारेन अशी धमकी देत आहे. अशी तक्रार रकमाजी गायकवाड यांनी निवेदनात नमुद केली आहे. सविताही न येण्याची भाषा करत आहे. महादेव सातपुते याच्यापासून माझ्या मुली नेहा,निकीता,मेघा,राणी व मुलगा यश यांच्या जिवाला धोका आहे. महादेव सातपुते याच्यावर कारवाई करावी व माझ्या लेकरांची त्याच्या तावडीतून सुटका करवी असी मागणी रखमाजी गायकवाड यानी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.




























































