टाटा पॉवरकडून होणारी वीजकोंडी महावितरण फोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वस्त दराने वीज विक्री केल्याने आर्थिक बोजा वाढत असल्याचे कारण देत टाटा पॉवरने सदर प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महावितरणला सुमारे 800 मेगावॅटच्या विजेचा तुटवडा होणार आहे. मात्र ही तूट भरून वाढण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून महानिर्मितीबरोबरच एनटीपीसी आणि खुल्या बाजारातून जादा वीज घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा पॉवरच्या मुंद्रा वीज प्रकल्पातून तयार होणारी वीज महाराष्ट्रासह अन्य राज्यांना सुमारे 2 रुपये 28 पैसे एवढय़ा स्वस्त दराने दिली जाते. मात्र आयात कोळशाची किंमत वाढली असल्याने टाटा पॉवरला वर्षाला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा वाढीव भार पडत आहे. त्यामुळे वीज दर वाढवण्याची मागणी वेळोवेळी टाटाकडून होत आहे. विजेचा तुटवडा भरून वाढण्यासाठी महावितरणने जादा विजेची तजवीज करून ठेवली आहे. महानिर्मितीबरोबर 11 हजार मेगावॅट विजेचे खरेदी करार केला आहे.