
नाणार प्रकल्प रद्द केला असून, नाणारवासीयांची जी भूमिका आहे, तीच भूमिका शिवसेनेची आहे. नाणार समर्थनात झालेला मेळावा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही.या मेळाव्याला आंबा व्यापाऱयांकडे काम करणाऱया नेपाळी लोकांना आणले गेले होते आणि त्यांना शिवसेनेचे असल्याचे भासविले गेले.या प्रकल्पासाठी गुजरातमधील लोकांनी जमीनी घेतल्या आहेत आता त्या शेतकऱयांना परत कराव्या लागणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी उघड केले.
सामंत म्हणाले, शिवसेनेची भूमिका ही कायम जनतेसोबत राहण्याची राहिली आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत.नाणार समर्थनात घेण्यात आलेल्या मेळाव्याचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट करून,राजापूर मधील आंबा व्यापाऱयांकडे असलेल्या नेपाळी कामगारांच्या गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून त्यांना या मेळाव्यात आणून ते शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे भासवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.






























































