मुंबई महानगरपालिकेत पाच दिवसांचा आठवडा सुरू; सकाळी 10 ते सायंकाळी 6 कामकाज चालणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारच्या धर्तीवर आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे. सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामाची वेळ सकाळी 10 ते 6 अशी राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता पालिका कर्मचाऱयांना या पुढे शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस साप्ताहिक सुट्टी लागू झाली आहे. याआधी ठाणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कर्मचाऱयांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱयांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला जावा ही मागणी मान्य करत राज्य सरकारने 29 फेब्रुवारी 2020 पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. याच धर्तीवर मुंबई महापालिकेत कर्मचाऱयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा अशी मागणी पालिका कर्मचारी संघटनांनी केली होती. त्याला पालिका प्रशासनाने आज मान्यता दिली.