
उत्तर प्रदेशमच्या उन्नावमध्ये भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर यांने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. आता पुन्हा उन्नाव एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे हादरले आहे. 12 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.
SN Sabat, ADG Zone Lucknow, after meeting the family of the victim: Everyone requested that the case be solved soon, they have assured us all cooperation. Strict action should be taken against the accused and we are working towards that. (11.03.2020) https://t.co/TgMqPh0m0u pic.twitter.com/gK5nUg9hql
— ANI UP (@ANINewsUP) March 12, 2020
उन्नाव जिल्ह्यात संपूर्ण गाव होळी खेळण्यात दंग होता. तेव्हा एक तरुण एका अल्पवयीन मुलीला घेऊन शेतात गेला. तिच्यावर त्याने बलात्कार केला आणि गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडित मुलगी बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाला असे तरुणाला वाटल्यानंतर तो तिथून फरार झाला. नंतर काही गावकर्यांनी तिला पाहिले असता तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. तिला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर तिची प्रकृती अधिक बिघडल्याने तिला दुसर्या इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अजूनही आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच जोपर्यंत आरोपीला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत पीडितेचे अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
गेल्या काही वर्षात बलात्कार आणि हत्येमुळे उन्नाव जिल्ह्याचे नाव खूप चर्चेत आले आहे. भाजप आमदार कुलदीप सेंगर याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्यात तिच्या वडिलांना अटक करून त्यांचा कोठडीतच मृत्यू झाला होता. तसेच पीडित मुलीचा जीवघेणा अपघातातून जीवही वाचला होता.
डिसेंबर महिन्यात एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. तिने तक्रार केली तेव्हा आरोपीला अटक करण्यात आली होती. नंतर आरोपीला जामीन मिळाल्यानंतर नराधमांनी तिला जिवंत जाळले होते. अखेर दोन दिवसानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
























































