
कोरोनाच्या फैलावापासून खबरदारी घेत असलेल्या मुंबईकरांनी रविवारी पाऱयाचा खेळ अनुभवला. पहाटेच्या सुमारास गारव्याने सुखावलेले मुंबईकर दुपारी घराबाहेर पडल्यानंतर असह्य रखरखीने भिरभिरले. शहराच्या कमाल तापमानाने अचानक 4 अंशांची उसळी घेत मार्चमधील उच्चांकी पातळी गाठली. सांताक्रूझमध्ये 37 अंश तापमान नोंद झाले. तर किमान तापमानात सरासरीपेक्षा चार अंशांनी घट होऊन ते 17.4 अंश इतके नोंदवले गेले.



























































