बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची निवड केली आहे. या स्मारकासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन केली होती.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर 13 मार्च 2020 रोजी या अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. तर न्यासाच्या सदस्य सचिवपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची व शशिकांत प्रभू यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.