
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाभरात लॉकडाऊन केले आहे. कलम 144 ही लागू केले शिवाय वाहतूक ठप्प केली. मात्र तरीही लोक गर्दी करत आहेत, गल्लोगल्ली रस्त्यावर गप्पाचे फड रंगत आहेत. हे सगळे चित्र गंभीर आहे. ते डोळ्यासमोर ठेवूनच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून बीड जिल्ह्यात संचार बंदी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ असेल. मात्र 11 ते 3 या वेळेत जमावबंदी लागूच असेल. पाच पेक्षा जास्त नागरिकांना येण्यास बंदीच असेल. या कालावधीत जीवनावश्यक, आपत्कालीन सेवा चालू राहणार ही बंदी 31 मार्च पर्यंत राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

























































