
कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, मास्क आणि सॅनिटायझर सारख्या अत्यावश्यक वस्तूंची मध्य रेल्वे इन-हाऊस निर्मिती करीत आहे, ज्याचा वापर आरोग्य सेवा कर्मचारी तसेच कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्यांना होणार आहे.
माटुंगा आणि परळ येथील कार्यशाळांमध्ये २,८३० मास्क आणि ३७५ लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आले आहेत.
मुंबई विभाग – ५,७५० मास्क आणि १४५ लिटर सॅनिटायझर;
नागपूर विभाग- ३,००० मास्क आणि १,१५० लिटर सॅनिटायझर;
सोलापूर विभाग – ३,००० मास्क आणि २४० लिटर सॅनिटायझर;
पुणे विभाग – १,८०० मास्क आणि १६३ लिटर सॅनिटायझर;
भुसावळ विभाग – ६,२०० मास्क आणि ६२० लिटर सॅनिटायझर
वाणिज्यिक, आरपीएफ, ऑपरेटिंग आणि मेकॅनिकल विभागातील रेल्वे कर्मचार्यांनी हे मास्क आणि सॅनिटायझर बनवले आहेत. वैयक्तिक योगदानाचाही यात समावेश आहे.
























































