आपत्‍कालीन सेवेसाठी आरटीओ पुरवणार रिक्षा, कल्याण डोंबिवलीत 45 वाहने 24 तास उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोना साथ पसरू नये यासाठी कल्याण डोंबिवलीत कडक संचारबंदी सुरू आहे. शहरांतर्गत वाहने फिरवण्यासह बंदी घालण्यात आली आहे. वैद्यकीय उपचार किंवा अन्य आपत्‍कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आरटीओ रिक्षा उपलब्ध करून देणार आहे. चार दिवसांपूर्वी 20 रिक्षा सुरू केल्या होत्या. आता यामध्ये आणखी 25 रिक्षांची वाढ केली आहे. या 45 रिक्षा 24 तास उपलब्ध असणार आहेत.

सर्वत्र संचारबंदी लागू असतांना महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आयत्‍या वेळेस अत्‍यावश्‍यक सेवेसाठी वाहतूकीचे साधन उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी ‘रिक्षा ऑन कॉल’ पध्‍दतीने उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहेत. यातील 28 रिक्षा कल्याणसाठी तर 17 रिक्षा डोंबिवलीसाठी असतील. या सर्व रिक्षांचे नंबर आणि चालकांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आपत्‍कालीन रिक्षा चालकाने रिक्षाच्‍या पुढे व मागे ”ऑन कॉल” असा बोर्ड लावायचा आहे.