
चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती उत्तमरीत्या सांभाळून कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासीयांचे आणि प्रशासानाचे कौतुक करीत अभिनंदन केलं. राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करीत परिस्थिती नियंत्रणात ठेवत प्रशासनानं जिल्ह्यात उत्तम काम केलं.
जिल्ह्याच्या सीमा सील करून बाहेरची आवक थांबवण्याचं मोठं आव्हान यशस्वीरीत्या पेललं गेलं. त्यामुळं कुणीही जिल्ह्यात येऊ शकलेलं नाही. त्यातच कोरोनाचा एकही रुग्ण जिल्ह्यात सापडलेला नाही. दीडशेवर संशयितांच्या चाचण्या झाल्या, पण सर्व निगेटिव्ह आल्या. हे चित्र जिल्ह्यासाठी आनंददायी आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हावासीयांचं अभिनंदन केलं.
























































