
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीची स्थापना करण्यात आली. लोकांनी आपली आर्थिक मदत द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. अशा वेळी सायबर गुन्हेगारांनी इथेही डल्ला मारला आहे. झारखंडच्या काही तरुणांनी पंतप्रधान सहायता निधीची एक खोटी वेबसाईट बनवली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी 51 लाख रुपयेचे चोरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
झारखंडच्या तिघांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी एक खोटी वेबसाईट बनवली आहे. त्यात दोन अकाऊंट नंबरही टाकले होते. काही लोकांनी या वेबसाईटमधील माहिती वाचून त्या खात्यात पैसेही जमा केले होते. तेव्हा या गुन्हेगारांनी ज्यांनी पैसे जमा केले त्यांच्य खात्यातून पैसे काढण्या सुरूवात केली. या गुन्हेगारांनी एकूण 51 लाख रुपयांवर डल्ला मारला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे.





























































