कोपरीतील सर्व एन्ट्री पॉईंट सील; ठाण्यात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन तयार करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामळे शहरात रेड, ऑरेंज व ग्रीन झोन तयार करण्याचे आदेश आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. या वर्गवारीमुळे ‘कोरोना’ शी दोन हात करताना नियोजन करणे प्रशासनाला अधिक सोपे होणार आहे. कोपरी येथे एकही कोरोनाबाधित रुग्ण अद्याप आढळला नसल्याने या भागातील सर्व एन्ट्री पॉईंट सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोपरीमध्ये बाहेरची व्यक्ती आत प्रवेश करू नये तसेच कोपरीतील व्यक्ती बाहेर पडू नये यासाठी कोपरी गावचे सर्व प्रवेश रस्ते सील केले जाणार आहेत. कळवा, मुंब्रासह इतर अनेक प्रभागांमध्ये कोरोनाबाधीत व्यक्ती आढळल्या आहेत. तथापि कोपरी आणि वागळे प्रभाग समितीतंर्गत एकाही कोरोनाबाधीत रूग्णांची नोंद झालेली नाही. प्रभागसमितीनिहाय रेड झोन, आँरेंज झोन आणि ग्रीन झोन तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेड झोन अंतर्गत येणाऱ्या एकूण 62 इमारती सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या भागात स्थानिक नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळत नसल्याने सीआरपीएफची तुकडीही तैनात करण्यात आली आहे.