ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बोरीस जॉन्सन हे स्वतः कोरोना ग्रस्त असून त्यांना 5 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर मात्र उपचारांदरम्यान त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. बोरीस जॉन्सन यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे असले तरी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते आणखी काही काळ कामावर रुजू होणार नाहीत अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक लोक आजाराने ग्रासले आहेत. युरोप खंडांमध्ये याचा अधिक प्रभाव पाहायला मिळाला ब्रिटनमध्ये तर पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनादेखील कोरोना विचारण्याची विषाणूची लागण झाली. यावर त्यांना काही काळ राहत्या घरीच उपचार देण्यात आले. मात्र 5 एप्रिल रोजी त्यांचा आजार बळावला त्यामुळे त्यांना सेंट थॉमस रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्रास अधिक वाढल्याने सहा एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. नऊ एप्रिल पर्यंत ते आयसीयूमध्ये होते.
बोरीस यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी काही काळ त्यांना आरामाची आवश्यकता आहे, अशा वैद्यकीय सल्ल्यानुसार ते तात्काळ कामावर रुजू होणार नाहीत, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना तेथे मिळालेल्या अत्यंत चांगल्या उपचाराबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले, कौतुकही केले. देशातील कोरोनाग्रस्तांना बद्दल ते काळजी करत असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.

बोरीस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रकृती लवकरच सुधारावी आणि या आजारातून ते बरे व्हावेत, असे म्हणत ट्विट केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह विविध राष्ट्रांच्या प्रमुखांकडून बोरीस यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती.