
मसुरे शिवसेनेच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्याने अडचणीत सापडलेल्या हातावर पोट असलेल्या कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविली जात आहे. मसुरेतही अशा 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच समीर हडकर, माजी जिप अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी पं. स.उपसभापती छोटू ठाकूर, उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, उपसरपंच राजेश गावकर, राजा कोरगावकर, पंढरीनाथ मसुरकर, सचिन पाटकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
































































