
‘करोना’च्या काळात गोरगरीब जनतेला रेशन दुकाताना धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. या धान्यवाटपात कोणताही गैरप्रकार न होता ते सुरळीत आणि विनातक्रार व्हावे. तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सरकारची होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी व्यक्तिशः आपापल्या जिल्ह्यात लक्ष घालावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पत्र पाठवून केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशनदुकानांमधून पुरेसे अन्न धान्य उपलब्ध केले जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील रेशनिंगवरील अन्न धान्याचा कोटा 3.87 लाख मेट्रीक टनांकरुन 7.74 लाख मेट्रीक टनावर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना 1.52 लाख मेट्रीक टनाचे अतिरिक्त धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गरीब नागरिकांना पुरेसे धान्य मिळाके, धान्याचे, सुरळीत वाटप व्हावे, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये याकडे व्यक्तीशः लक्ष देण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
– राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत 7 कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी 2 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानाकरुन देण्यात येत आहे. केंद्रसरकारकडून जाहीर झालेल्या 5 किलो मोफत तांदळाचे वाटपही सुरु आहे. ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्यांच्यासाठी 8 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 12 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ काटपाचा निर्णय घेतला आहे.
– शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर 1800224950 आणि 1967 हे टोलफी दूरध्वनी क्रमांक दिले आहेत.


























































