दिव्याहुन  पायी चालत आलेल्या चौदाजणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; चालत आलेल्यांमध्ये 7 वर्षाच्या मुलीचाही समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमधून कोकणात पायी चालत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रेल्वे रुळ किंवा छुप्या मार्गाने चालत कोकणात दाखल होणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरु असतानाच शुक्रवारी रात्री दिव्याहुन खेडमध्ये आलेल्या तब्बल 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रवाशामध्ये एक सात वर्षाच्या मुलींचाही समावेश असून या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना येथील  येथील आयसीएस महाविद्यालयामध्ये संस्थात्मक कक्षात ठेवण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. लॉकडाऊनमुळे काहीजंणांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या पर्यायाचा वापर करत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी नातूनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेले चौदाजण हे दिवा येथील रहिबाशी असून ते खेड तालुक्यातील खाड़ीपट्टा परिसरातील सवणस आणि मुंबई या गावांमध्ये यायला निघाले होते.

पोलिसांची नजर चुकवत कधी रस्त्याने तर कधी रेल्वे रुळातून ते खेड पर्यंत पोहचले मात्र नातुनगर यथील चेकपोस्टवर असलेल्या पोलिसांची नजर चुकवण्यान ते अपयशी  ठरले. पोलिसांनी या सर्व प्रवाशांना आरोग्य विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांची आवश्यक ती तपासणी करुन या सर्व प्रवाशांना आयसीएस महाविद्यालयात संस्थात्मक क्वारनटाईन केले. पुढील चौदा दिवस या सर्व प्रवाशांचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे.

दरम्यान तालुका वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कळंबणी येथील आयसोलेशन वार्डमध्ये दोन कोरोना संशयित असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. तर याच रुग्णालयात अन्य चारजणांना संस्थात्मक क्वारनटाईन करण्यात आले आहे. लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या क्वांरनटाईन कक्षात 50 जणांना ठेवण्यात आले आहे. तर आयसीएस महाविद्यालयात 19 जणांना संस्थात्मक क्वारनटाईन करण्यात आले आहे.

परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 312 असून त्यापैकी 311 जणांना होम क्वारनटाईन करण्यात आले आहे तर एकाचा 8 एप्रिल रोजी बळी गेला आहे.