सिंधुदुर्गात रंगला अनोखा विवाह सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
marriage-sindhudurga

लग्न म्हटलं की, हळद, मंगलाष्टके, वऱ्हाडी मंडळी आणि सनईचे सूर.. वरातीत नाच गाणी अन् मित्र मैत्रिणीचा जल्लोष.. असं सारं वातावरण डोळ्यासमोर येते… मात्र या लॉक डाऊनमुळे सारंच नियोजन कोलमडलं. काहींनी तर आधीच बुकींग करून ठेवलेले हॉल ऐनवेळी रद्द केले. मात्र अशा परिस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावात सामाजिक भान ठेवत एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याला केवळ नवरा-नवरी, त्यांचे आई-वडील आणि भटजी असे पाचच जण उपस्थित होते. इतकंच नव्हे तर लग्न लागल्यानंतर नवरदेवाने नवरीला घेऊन दुचाकीवरूनच वरात काढली.