
संभाजीनगरमधील समता नगरातील दोन जणांची कोविड चाचणी मंगळवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता संभाजीनगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेले समता नगरातील दोन्ही रुग्ण पुरुष असून एकाचे वय 51 वर्षे तर दुसऱ्याचे वय 25 वर्षे आहे. सध्या ते महानगरपालिकेच्या एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या दोन्ही रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे पाठवण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.



























































