
लॉकडाऊन असताना चंद्रपूर जिल्ह्यात भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. सामना ऑनलाईनवर ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर प्रशसानाने बाजारासाठी नवीन रचना प्रस्तावित केली आहे.
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस भाजी बाजार सुरू राहणार आहे. आधी हा बाजार सातही दिवस सुरू राहायचा. तर फळ बाजार मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस सुरू राहील. म्हणजे भाजी बाजार व फळ बाजार आता केवळ तीन-तीन दिवस सुरू राहणार आहे. रविवारी बाजाराला सुटी देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असून, याची अंमलबजावणी 27 एप्रिलपासून केली जाणार आहे.
बाजार समितीनं पत्र जारी केले आहे. भाजी बाजारात पहाटे चार वाजल्यापासून वाहनांची आणि ग्राहकांची गर्दी उसळत होती. सोशल डिस्टसिंगची पर्वा न करता लोक भाजी खरेदीसाठी गर्दी करू लागले होते. यावर आता ही नवीन सुधारणा करण्यात आली.





























































