
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदी असताना आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रकार संगमेश्वर येथे घडला आहे. किरकोळ कारणावरुन जमाव करुन मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरळ डिकेवाडी येथे गुरुवारी रात्री ही मारहाण झाली.
मारहाण व शिवीगाळ प्रकरणी नितीन करंडे, राजेंद्र करंडे, पांडुरंग डिके, शांताराम करंडे, सिध्देश नारकर, निखिल डिके, प्रथमेश डिके, आणि लिला करुंडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुमित्रा डिके हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लिला करंडे हिने सुमित्रा डिकेला किरकोळ कारणावरून शिविगाळ केली. त्यावेळी ती सुमित्रा लिलाला समजविण्यास गेली असता आठ जणांनी गुरुवारी रात्री तिच्या घरात जाऊन सुमित्रा आणि घरातील मंडळीना शिवीगाळ आणि मारहाण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदीचा आदेश असतानाही जमाव करुन मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


























































