
लॉकडाऊनच्या काळात मद्याची वाहतूक आणि विक्रीला बंदी असताना नगर-पुणे महामार्गावरील भूषणनगर येथे एका चारचाकी वाहनातून 9 बॉक्स बिअर आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी असा एकून 8 लाख 35 हजार 640 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सिध्देश खरमाळे, संदेश सिताराम शिंदे यांना ताब्यात घेतले असून अर्जुन कांता काळे, अक्षय हे दोघांनी पलायन केले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नगर शहरामध्ये बंदी असताना नगर-पुणे महामार्गाावर इनोव्हा गाडीमधून भूषणनगरकडे जात असताना गाडी पोलिसांनी अडवली. गाडीची झाडाझडती घेतल्यावर या गाडीमध्ये 9 बिअरचे बॉक्स आढळले. हा माल स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला असून या प्रकरणी चार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या मालाची एकुण किंमत 8 लाख 35 हजार 640 रुपये असून इनोव्हा गाडीची किंमत 8 लाख रुपये आहे. तर उर्वरीत रक्कम मद्याची आहे. लॉकडाऊनच्या काळात बंदी असताना मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी मुद्देमालासह वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस शिवाजी ढाकणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक संतोष गर्जे करत आहेत.
































































