जालन्यात शेगाव- पंढरपुर मागावरील पुलाचा भाग कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील शेंगाव- पंढरपुर दिंडी मार्गावर येथे एका पुलाचा भाग कोसळला आहे. सुदैवाने यात जिवीतनाही झालेली नाही.

शेगाव- पंढरपुर दिंडी मार्गावर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पुर्णा येथे निर्माणाधीन असलेल्या पुलाचा काही भाग रविवारी सायंकाळी 6 वाजता कोसळला. दुर्देवाने यात कुठलीही हानी झाली नाही. यावेळी कामगारांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. काम सुरु असतानाच ही घटना घडल्याने पुलाच्या कामाविषयी शंका उपस्थित होत आहे.