
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून हिंगोली येथील सदभाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभय भरतीया यांच्या पुढाकाराने 27 एप्रिल रोजी तिरुपतीनगर भागात आयोजित रक्तदान शिबीरामध्ये 52 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तर कळमनुरी येथे महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त संघर्ष मित्रमंडळ कळमनुरीच्या वतीने आज 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 125 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
हिंगोलीत कोरोनाचे 11 रुग्ण आढळुन आले आहेत. महाराष्ट्र शासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने रक्तदानासाठी आवाहन आहे. हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदभाव सेवाभावी संस्था, हेल्पिग हँडस ग्रुप व बी-प्रोफेशनल फिटनेसच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती अभय भरतीया यांनी दिली. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार संतोष बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरा मुंढे, श्रीशैल्य स्वामी, जिल्हा काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे, नगरसेवक राम कदम यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीच्या डॉ. दिपमाला पाटील, आश्विनी मुंढे, आत्माराम जटाळे, श्रीनिवास निर्मळ, गणेश देशमुख, नितीन हांडगे, संदीप घुगे यांनी मदत केली.
तर कळमनुरी येथील श्री गुरु तोटलींग स्वामी मठ संस्थानमध्ये संघर्ष मित्रमंडळाने नांदेड येथील गोळवलकर गुरुजी रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबीर घेतले. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, भगवान परशुराम, भगवान महावीर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, संघर्ष मित्रमंडळाचे राजू पटणे, विश्वनाथ चौधरी, शिवराज पाटील, संजय कापसे, आर. आर .पाटील, मयूर शिंदे, विलास वायकोळे, सचिन व्यवहारे, सागर थळपते, नागेश सोनुने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























































