Corona Virus update – देशात गेल्या 24 तासात 4213 इतके रुग्ण वाढले, बरे होणाऱ्यांची संख्या मोठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून रुग्णांचा आकडा 67,152 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 2,206 रुग्णांचा मृत्यू झाला असून 20,917 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 44,029 रुग्णांवर उपचार सुरू.

लॉकडाऊन सुरू असताना देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिंतेत अधिक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 4213 इतक्या जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असली तरी 20 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले ही एक दिलासा देणारी बाब आहे.