
मध्यप्रदेशातील मजुरांसाठी मंगळवारी सायंकाळी पनवेल येथून रेल्वे सुटणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील सुमारे सहाशेहून अधिक मजूरांना 30 गाड्यातून पनवेल पर्यंत सोडण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
आज सकाळी 7 वाजल्यापासून 30 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण येथील डेपोतून बसेस सोडण्यात येत आहेत. एका बसमधून 22 मजूर सोशल डिस्टनसिंगचे पालन करत प्रवास करत होते.
कोरोनाच्या लढ्यात जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका प्रशासकीय यंत्रणेला मदत करत आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या 27 रुग्णवाहिका सर्व ठिकाणी मोफत कार्यरत आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याची ही मोफत रुग्णवाहिका सेवा गेली दहा वर्षे सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढत आहे. कोरोना संशयितांना रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयातून पुन्हा त्यांच्या गावी सोडणे, अपघात स्थळी दाखल होऊन त्यांना नजीकच्या दवाखान्यात दाखल करणे संस्थानच्या रूग्णवाहिकांमुळे शक्य झाले आहे.






















































