दिलासादायक, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाचे संकट दिवसें दिवस वाढत आहे. या संकटात आज एक दिलासादायक बातमी आहे. आज मुंबईत कोरोनाचे रुग्ण नेहमी पेक्षा निम्म्याने आढळले आहेत. सोमवारी मुंबईत 791 रुग्ण आढळले आहे. ही संख्या निम्म्यावर आली असून आज कोरोनाचे 426 रुग्ण आढळले आहेत.

महानगर पालिकेच्या रुग्णालयत तीव्र कोविड रुग्णांसाठी नवीन औषधांचा यशस्वी वापर महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अथक प्रयत्न करित आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी नवीन औषधाचा वापर सुरू केला आहे. त्याचे नाव ‘इंजेक्शन टोसीलुझूमॅब’ असून त्याचा फायदा होताना दिसत आहे. आतापर्यंत सुमारे 40 रुग्णांना हे औषध देण्यात आले आहे. पैकी 30 रुग्णांमध्ये या औषधामुळे चांगले परिणाम आढळून आले आहेत तसेच 14 रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज झाले आहे. या औषधामुळे रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तर झालीच, समवेत त्यांना व्हेंटीलेटर लावण्याची आवश्यकता भासली नाही. जगभरातील विविध वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्णालये यांच्या अनुभवांच्या आधारे या औषधाचा उपयोग करण्यात आला आहे.