
बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कळंब तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे केज तालुक्यातील 7 गावेही बफर झोन म्हणून जाहीर केली आहेत. या गावांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. केज तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही माहिती दिली आहे. केज तालुक्यातील सोनेसांगवी, मांगवडगाव, माळेगाव, लाखा भोपळा, हादगाव, सुरडी, बोरगांव या सात ठिकाणी बफर झोन जाहीर केले आहे. बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केज तालुक्यातील सात गावे आजपासून सात किलोमीटर परिसरात अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू केली आली आहे.






















































