सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 5 रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 17 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 झाली आहे. कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईनमध्ये असणाऱ्यांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सांगलीतील लक्ष्मी नगर येथील एकाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच साळशिंगी (ता. खानापूर) येथील आठ वर्षीय मुलाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुधेभावी येथील कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित दोघांचे 15 दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच घोरपडी येथील रुग्णाचे 15 दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यापैकी 32 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 17 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.