जालना जिल्ह्यातील सुभानपुर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुभानपुर येथील तरुण शेतकऱ्याने कर्जपायी कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मे रोजी उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुभानपुर येथील शेतकरी भाऊसाहेब कडुबा कोल्हे (22) यांनी शनिवार 16 मे रोजी विविध बँकेच्या कर्जाला कंटाळून शेती मालास योग्य भाव मिळत नाही, तथा नापिकीला कंटाळून सायंकाळी 5 वाजेदरम्यान कीटक नाशक प्राशन केले होते. त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात दाखविण्यात आले. परंतु प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथे पाठविण्यात आले. जालना येथील खासगी दवाखान्यात उपचारा दरम्यान रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान निधन झाले. सोमवारी जालना येथे पोलीस पंचनामा करून जालना येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान सदरील शेतकरी भाऊसाहेब कढुबा कोल्हेवर सोमवारी दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात सुभानपुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी, पत्नी, भाऊ पराशर शिक्षक पतसंस्थाचे संचालक संजय कोल्हे याचे लहान बंधु होते.