
बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या रिपोर्टमधील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर अन्य 90 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. शिवाय 6 जणांच्या स्वॅबबाबत कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही.
आज पॉझिटीव्ह आढळून आलेल्यांमध्ये वडवणी येथील 67 वर्षीय पुरुष, पाटोदा 73 वर्षीय पुरुष, वाली चिखली ता पाटोदा येथील 2 महिला ज्यांची वय 60 व 27 अशी आहेत. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
आतापर्यंतची आकडेवारी
पिंपळा – 1
इटकूर – 2
हिवरा – 1
कवडगाव थडी – 2
बीड – 5
चंदन सावरगाव- 1
केळगाव – 1
वडवणी – 1
पाटोदा – 1
वा.चिखली – 2
एकूण- 17
अॅक्टीव्ह रुग्ण -16
बरे झालेले रुग्ण 1 (पिंपळा ता.आष्टी)
पाटण सांगवीत आढळलेल्या 7 रुग्णांची नोंद बीड जिल्ह्यातून काढून टाकण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
वडवणीत संचारबंदी- वडवणी मध्ये बाहेरून आलेला रुग्ण कोरोना ग्रस्त निघाला आहे, खबरदारी चे उपाय म्हणून माध्यरात्रीच वडवणीत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

























































