लैंगिक सुखासाठी गुप्तांगात घुसवली मोबाईलची वायर, ऑपरेशन करताना डॉक्टरही चक्रावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लैंगिक सुख मिळविण्यासाठी लोकं काय काय करतील याचा नेम नाही. आसाममधील एका व्यक्तीला लैंगिक सुख मिळविण्यासाठी गुप्तांगात वेगवेगळ्या वस्तू घुसविण्याची सवय होती. मात्र त्याची ही सवय एकदा त्याला चांगलीच महागात पडली. त्याच्यावर ऑपरेशन करताना त्याने केलेला पराक्रम पाहून डॉक्टरही चक्रावून गेले होते.

गुवाहटी येथील एका 30 वर्षाच्या या व्यक्तीने लैंगिक सुख मिळविण्यासाठी त्याच्या गुप्तांगात मोबाईल चार्जरची वायर घुसवली होती. तो आनंद मिळवत असताना त्याच्या लक्षातच आले नाही की पूर्ण वायर कधी आत घुसली. ती वायर आत जाऊन त्याच्या मूत्राशयात अडकली. त्यानंतर या व्यक्तीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. मात्र आपला हा विकृतपणा डॉक्टरांकडे सांगणार कसा, म्हणून त्याने डॉक्टरांना आपण मोबाईलची वायर गिळाल्याचे सांगितले.

‘त्याने वायर गिळाल्याचे सांगितल्याने आमगीत्याच्यावर एऩ्डोस्कॉपी केली. पण त्यात काहीच आढळून आले नाही. त्यामुळे मग ऑपरेशन करून त्याच्या पोटातली वायर काढण्याचे ठरवले. मात्र पोटात ती वायर नव्हतीच त्यामुळे ऑपरेशन टेबलवरच त्याचा एक्सरे काढण्यात आला. त्यानंतर त्याचा एक्सरे पाहून आम्ही चक्रावलोच. ती वायर त्याच्या मूत्राशयात अडकलेली होती. ऑपरेश करून त्याच्या मूत्राशयातून ती वायर काढली. त्यानंतर रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला खरं कारण विचारले असता त्याने आम्हाला धक्कादायक माहिती दिली. त्याने ती वायर त्याच्या गुप्तांगातून आत घुसवली होती. मी गेली 25 वर्ष शस्त्रक्रीया करतोय पण असा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. ‘, असे त्या तरुणावर शस्त्रक्रीया करणाऱ्या डॉ. इस्लाम यांनी सांगितले.