
कोल्हापूर मध्ये आज सायंकाळी आठ पर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजअखेर कोरोना बाधीतांची संख्या 696 झाली आहे.काल पासुन चार नवे रुग्ण आढळले. तर काल रात्री पर्यंतचे आणि आज दिवसभरात 22 अशा एकुण 64 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असुन, आतापर्यंत 594 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 8 कोरोना बाधीतां चा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 94 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन रात्री उशीरा देण्यात आली. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 136 प्राप्त अहवालापैकी 2 अहवाल पॉझीटिव्ह आले. हे दोन्ही रुग्ण भुदरगड तालुक्यातील आहेत. रात्री 8 वाजेपर्यंत 35 प्राप्त अहवालापैकी 1 अहवाल हातकणंगले येथील पाॕझीटिव्ह आला. तर 5 अहवाल नाकारण्यात आले.






























































