माजी आमदार युनुसभाई शेख यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरचे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सकाळी 11.30 वाजता निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. शनिवारी त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

1969, 1975 आणि 1985 मध्ये तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. 1990 झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र, 1998 साली सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या पश्‍चात चार मुले, तीन मुली असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी शेख यांची ओळख होती. सोलापूरच्या राजकारणावर त्यांची पकड होती.