सोमवारी बेस्टने तीन लाख 28 हजार जादा प्रवासी वाहीले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-bus

लॉकडाऊन थिथील करताना सरकारने खाजगी आणि सरकारी कार्यालये सुरू केली. आणि बेस्टवरचा ताण कमी करण्यासाठी उपनगरीय लोकलच्या सोमवारी 147 फेऱ्या चालविल्या. मात्र, प्रत्यक्षात त्या बेस्टने दिवशी तीन लाख 28 हजार जादा प्रवाशांची वाहतूक केल्याने लोकल या फेऱ्यांचा बेस्टच्या गर्दीवर काही परिणाम न होता उलट बेस्टची गर्दी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनलॉकच्या तिसरा टप्पा सुरू करण्यात येऊन खाजगी आणि सरकारी कार्यालये सुरू झाल्याने मुंबईची खरी लाईफ लाईन म्हटली जाणारी लोकल मर्यादीत स्वरुपात सोमवारपासून सुरु करण्यात आली. केवळ सरकारी अत्यावश्यक सेवा आणि खासगी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना या लोकलमध्ये परवानगी देण्यात आली. लोकल सुरू होत असल्याने भरपूर प्रमाणात लोकांनी रेल्वे स्थानके गाठली. पहिल्या दिवशी सकाळी लोकलमध्ये खाजगी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश न दिल्याने त्यांनी पुन्हा बेस्ट बसेस आणि एसटीला रांगा लावत गर्दी केली. त्यामुळे आदल्या दिवशी रविवारी 2 लाख 58 हजार 783 इतके असलेले प्रवासी दुसऱ्या दिवशी सोमवारी 15 जून रोजी 5 लाख 87 हजार 19 इतके वाढले. 3 लाख 28 हजार 236 इतके प्रवासी बेस्टला मिळाले. तसेच रविवारी 14 जून रोजी 24 लाख 58 हजार असलेले उत्पन्न तरी 55 लाख 57 हजार 962 इतके वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.