लातूर जिल्ह्यात नवीन 11 कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले, रुग्णांची संख्या 208 वर पोहोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात पुन्हा अकरा पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. लातूर जिल्ह्यात दि.16 रोजी दहा रुग्ण वाढले तर दिनांक 15 रोजी प्रलंबित असलेल्या एका रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या 11 ने वाढली.लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 208 वर पोहोचली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये दि.16 रोजी लातूर जिल्ह्यातील 93 जणांचे अहवाल तपासणीसाठी आले होते. या तपासणीत दहा नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून दोघांचे अहवाल अनिर्णित आले आहेत. 81 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत घेण्यात आलेल्या एकूण 20 व्यक्तीचे स्वॅब पैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या मध्ये एक व्यक्ती जुनी कापड लाईन, लातूर येथील असून त्यांचे वय 22 वर्ष आहे. तर दुसरी व्यक्ती आंधोरा ता. औसा येथील असून त्यांचे वय 55 वर्षे आहे. दि.१६ रोजी झालेल्या तपासणीमध्ये उदगीर येथील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. औसा येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून निलंगा येथील एका जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दिनांक 15.06.2020 रोजी कासारशिरसी येथील प्रलंबित असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे उमापूर जी. बिदर, कर्नाटक राज्य येथील 02 रहिवासी वय 21 व 30 वर्षे यांची दिनांक 29.05.2020 रोजी उमापूर येथून तपासणी करण्यात आली होती दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते त्यांची दिनांक 15.06.2020 रोजी पुन्हा तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यामुळें त्यांना दि.१६ रोजी रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.