मुंबईतल्या डबेवाल्यांसाठी शिवसेना सरसावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या मुंबईतल्या डबेवाल्यांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी मुंबईतल्या सुमारे साडे तीनशे डबेवाल्यांना रेशनचे वाटप केले आहे.

मुंबईत सुमारे पाच हजार डबेवाले आहेत. पण लॉकडाऊनमुळे डबे पोहोचवण्याचे काम बंद झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे आर्थिक संकट अशा वेळेस बहुतांश डबेवाल्यांनी गावाला जाऊन शेती सुरू केली पण मुंबईत राहिलेल्या डबेवाल्यांसमोर मोठी विवंचना होती. अखेर विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱहे व अॅक्शन अॅण्डच्या निरजा भाटकर अंधेरी, दहिसर, बोरीवलीमधील सुमारे साडे तीनशे डबेवाल्यांच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी या डबेवाल्यांच्या पुटुंबियांना रेशन किटचे वाटप केले. मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी या मदतीबद्दल डॉ. नीलम गोऱहे व शिवसेनेचे आभार मानले आहेत. मागील 130 वर्षे डबेवाल्यांनी मुंबईकरांना जेवायला घातले पण आजच्या अडचणीच्या काळात शिवसेनेने आम्हाला जेवायला घातले, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले