पेण, नागोठणेतील रिलायन्स टाऊनशिप कंटेन्मेंट झोन घोषित 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण शहरात आणि नागोठणेतील रिलायन्स टाऊनशिप येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिचिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणाला कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. पेण शहरातील महावीर मार्गावरील सोमाजी कॉम्प्लेक्स या इमारतीतील दुसरा मजला तसेच रोहिदास नगर येथील कोरोनाबाधित रुग्णाचे घर त्याच प्रमाणे शहरातील उत्कर्षनगर भागातील शिवम रेसिडेन्सी या इमारतीतील तिसरा मजला कोरोनाबाधित क्षेत्र म्हणजे कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

रिलायन्स टाऊनशिप नागोठणे येथील एएममधील रुम नं 19 ते24 व एच-1, मधील रुम 10,11,12 आणि एच 22, 23, 24 रुमपर्यंतचे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या कोरोनाबाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.