कोरोनामुळे डबेवाल्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीची झळ आता मुंबईतील मॅनेजमेंट गुरू डबेवाल्यांनादेखील बसली आहे. कोरोनामुळे मुंबईतील एका डबेवाल्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. संतोष जाधव असे मृत डबेवाल्याचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मालाड येथे राहणारे संतोष जाधव हे मुंबईत डबेवाले म्हणून काम करीत होते, अशी माहिती मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. जाधव यांच्या मागे आई -वडील पत्नी व एक मुलगा असल्याची माहिती तळेकर यांनी दिली. तर कोरोनामुळे चार महिने डबेवाल्यांना पगार नाही. त्यात कर्त्या पुरुषाचे निधन झाले असल्याने डबेवाल्यांचे कुटुंब सर्व बाजूनी संकटात सापडत असून अशा कुटुंबाला सरकारने मदत केली पाहिजे, अशी मागणी तळेकर यांनी यावेळी केली.