वाघिवरेत गोवंश हत्या, चौघांना 30 जून पर्यंत कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

चिपळूण तालुक्यातील वाघिवरे मोहल्ला येथे गोवंश हत्या करताना पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले. गोवंश हत्या होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा घालून अब्दुल गनी साबळेसह चौघींनी रंगेहाथ पकडले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीना 30 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

गोवंश हत्याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. एका घराच्या मागे चौघेजण जनावराची चामडी काढताना दिसले त्यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडील सुरे व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.चिपळूण तालुक्यात कामथे आणि पिंपळी येथे गोवंश हत्या झाल्याचे उघड झाले होते त्यानंतर पोलिसांनी गोवंश हत्या करणारी मुंबईतील टोळी पकडली होती.