
कोरोनामुळे जवळपास साडेतीन महिने ‘लॉकडाऊन’ असलेले शिर्डीचे प्रसिद्ध साईमंदिर आता भाविकांसाठी ‘अनलॉक’ होण्याच्या तयारीत आहे. सरकारची परवानगी मिळताच मंदिर सुरू करण्याची तयारी संस्थान प्रशासनाने केली आहे. सुरुवातीला तासाभरात तीनशे ते साडेतीनशे म्हणजे प्रत्येव मिनिटाला चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. त्यात ठरावीक वेळेनंतर दर्शन रांगा, रेलिंग सॅनिटायझर करावे लागणार असल्याने दर्शनासाठी जवळपास दहा तासांचा कालावधी लागणार आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थानवडून प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचे स्क्रिनिंग, सॅनिटायझरेशन, सोशल डिस्टन्स पाळणे यावर भर दिला जाणार आहे. शासनाने मंदिर खुले वरण्याबाबत आदेश आल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले वरण्यात येणार आहे. तसेच पासधारक भाविकांना टाइम दर्शनाच्या माध्यमातून नियोजनबद्ध दर्शन देता येईल, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शिर्डीतील साई मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव साईभक्तांविना अतिशय साध्या पद्धतीने साजरा वरण्यात आला. साईनामाच्या गजराविना साईबाबांची शिर्डी सुनीसुनी दिसत होती. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरात पद्धतीने पूजाविधी वरण्यात आले. पहाटे 4.30वाजता ‘श्रीं’ची कावड आरती घेण्यात आली. 5 वाजता श्री साईसच्चरित पवित्र गंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. यावेळी श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूव काढण्यात आली. मिरवणुकीत संस्थानचे पुजारी उदय बाळुंजवर यांनी विणा, दिलीप सुलाखे यांनी पोथी तर विलास जोशी व चंद्रकांत गोरकर यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी मंदिरप्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.






























































