बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला दिलासा, गर्भपाताची हायकोर्टाकडून परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली येथील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अर्भकाला जन्म दिल्यास अल्पवयीन मुलीच्या जीवाला धोका पोहोचू शकतो याची दखल घेत हायकोर्टाने 23 आठवडय़ाच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी दिली.

पीडित मुलगी 12 वर्षांची असून तिच्या परिसरात राहणाऱया काही नराधमांनी तिच्यावर अनेवदा अत्याचार केले. पोटात दुखत असल्याने मुलीने याची माहिती आपल्या आईला दिली. वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर या प्रकरणी आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वरण्यात आला. नियमानुसार 20 आठवडय़ानंतर गर्भपात करण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते. अर्भकाला जन्म दिल्यास आपल्या मुलीला मानसिक आणि शारीरिक इजा पोहोचू शवते. त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी अशी मागणी करत अल्पवयीन मुलीच्या आईने हायकोर्टात अर्ज केला. न्यायालयाने याप्रकरणी मिरज येथील शासकीय रुग्णालयाने मुलीचा वैद्यकीय तपासणी अहवाल कोर्टात सादर केला. अर्भकाला जन्म दिल्यास पीडित मुलीच्या जीवाला धोका पोहोचू शकतो असे त्या अहवालात डॉक्टरांनी म्हटले आहे याची दखल घेत हायकोर्टाने मुलीला गर्भपात वरण्याची परवानगी दिली.