लग्नाच्या दहा वर्षांनी सावत्र मुलाच्या प्रेमात पडली, नवऱ्याला घटस्फोट देऊन थाटला दुसरा संसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. याचा प्रत्यय रशियातील एका घटनेमुळे आला आहे. रशियातील एका महिलेने आपल्या सावत्र मुलाशी विवाह करण्यासाठी दहा वर्षांचा संसार मोडला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील सोशल मीडिया स्टार असलेल्या मरीना बलमशेवा या महिलेचा विवाह दहा वर्षांपूर्वी ऐरे नावाच्या माणसाशी झाला होता. त्यावेळी ऐरेचा मुलगा व्लादिमीर हा दहा वर्षांचा होता. मरीना आणि ऐरे यांच्या दहा वर्षांच्या संसारारदरम्यान मरीना ही व्लादिमीरच्या प्रेमात पडली. तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने ऐरेला घटस्फोटही दिला.

घटस्फोटानंतर त्यांना 2020च्या सुरुवातीलाच विवाह करायचा होता. मात्र कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी तो बेत पुढे ढकलला. आता गेल्या आठवड्यातच या दोघांनी विवाह केला आहे. मरीना हिने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. मरीना आता गर्भवती असून हे नवदांपत्य सध्या दुसऱ्या एखाद्या मोठ्या शहरात स्थायिक होण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहे मरीना
वजन घटवण्याचा प्रवास विशद करणाऱ्या एका माहितीपटातून मरीना प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर ती सोशल मीडिया स्टार बनली होती.


View this post on Instagram

Представьте , что здесь очень интересный пост. С лёгкими нотками юмора. Немного сарказма. Много смайликов. Вы читаете его с улыбкой и пишите какие-то комментарии по тему. Я их лайкаю. Иногда вступаю в дискуссии. ( надеюсь, что ваше воображение очень богатое, так как мой беременный мозг покинул меня сегодня и только легкие порывы сквозняка проходят через уши, поэтому просто фото. Но вы уж постарайтесь: поддержите. Тема же серьёзная. Включите фантазию сегодня, так сказать, у вас сочинение на свободную тему или «как я провёл лето»)

A post shared by Марина Балмашева (@marina_balmasheva) on