चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 324 वर, 195 रुग्ण उपचारानंतर घरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात कालपर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३०९ होती. आज त्यामध्ये दुपारी तीन पर्यंत १५ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ३२४ झाली आहे. यापैकी १९५ बाधितांना उपचाराअंती कोरोना आजाराचे कोणतेही लक्ष नसल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्या जिल्ह्यात १२९ बाधितांवर उपचार सुरू आहे.

चंद्रपूर शहरांमध्ये सध्या २६ मार्चपर्यंत टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे आज पुढे आलेले 15 बाधित हे जिल्ह्यातील अन्य भागातील आहे यामध्ये संपर्कातून बाधित झालेल्या पॉझिटिव्हची संख्या अधिक आहे.

गडचांदूर येथे देखील संपर्कातून व बाहेरून आलेले सहा बाधित पुढे आले आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी व एकूणच समाजासाठी बाहेरून कुठेही प्रवास केल्यास स्वतः पुढे येऊन चाचणी करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.