बॉलीवूड, उद्योग जगताकडून पालिकेचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र घेत असलेल्या प्रयत्नांची दखल बॉलीवूड आणि उद्योग जगतातील दिग्गजांनी घेतली असून पालिकेचे तोंड भरून कौतुक केले आहे. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांची आई कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली. कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेगळे टाकू नका. त्यांनाही भावनिक गरज असते, असे सांगत डॉक्टर्स आणि पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, आरोग्य अधिकारी हेच मुंबईचे खरे हिरो आहे, असे त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

त्याचबरोबर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही पालिकेचे आभार मानले. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेने तातडीने पावले उचलल्याने नियंत्रण शक्य झाले. कोरोना रोखण्यासाठी मुंबई पालिकेने उचललेल्या अनेक उपाययोजनांचा कित्ता इतर शहरांनीही गिरवण्यासारखा आहे, अशा शब्दांत महिंद्रा यांनी कौतुक केले.