
लातूरमध्ये आज कोरोनाचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या दीड हजारांवर गेली आहे. आज उदगीरमध्ये एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लातूरमध्ये 24 आणि 25 जुलै रोजीचे मिळून 21 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. उदगीर येथे उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 73 वर जाऊन पोहोचलेली आहे. लातूर जिल्ह्यातील 886 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आलेले आहे. तर 554 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली 62 वर्षीय कोरोनाबाधित महिला उपचारादरम्यान मृत्यू पावली. लातूर जिल्ह्यातील कोरोनामृत्यूची संख्या 73 वर पोहंचली आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासा दायक बातमी म्हणजे तब्बल 89 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.






























































