
परदेश व्यापार महासंचलनालयाने (डीजीएफटी) कलर टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर मोफत या श्रेणीतून काढून कलर टीव्ही आता प्रतिबंधित श्रेणीमध्ये टाकण्यात आला आहे. या निर्णयामुळे चीनचे सर्वाधिक आर्थिक नुकसान होणार आहे.
वर्षाकाठी चीनमधून 2184 कोटी रुपयांचे कलर टीव्ही हिंदुस्थानात येतात. व्हीएतनाममधून 3200 कोटी रुपयांचे कलर टीव्ही आयात करण्यात येतात. डीजीएफटीच्या निर्णयानुसार परदेशातून येणार्या 36 सेमी ते 105 सेमीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या टीव्हीवर बंदी घालण्यात आली आहे.




























































